22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला

मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झालेले आहेत. दोघांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरु आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटलेले आहे. राज्यात मराठा आंदोलक हिंसक मार्गाने आंदोलने करीत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR