30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ४ हजार कोटीची जमीन लाटली

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ४ हजार कोटीची जमीन लाटली

बंगळूरू : वाल्मिकी विकास महामंडळात १८७ कोटींचा गंडा घालणा-या मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आता म्हैसूर विकास प्राधिकरणात (मुडा) ४,००० कोटींची जमीन लाटली असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्नीच्या नावावर बेकायदेशीरपणे ‘मुडा’ची संपत्ती हस्तांतरित केल्याच्या आरोप फेटाळून लावला. हा प्रकार भाजपच्या काळातला आहे. एक एकर १५ गुंठे जमीन माझ्या पत्नीच्या नावावर आहे. माझ्या पत्नीच्या मेव्हण्याने ही जमीन घेतली आणि माझ्या पत्नीच्या नावे केली. मी सत्तेत असताना जमीन खरेदी केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

चार हजार कोटींचे हे प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रकरण सीबीआयकडे किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाकडे सोपवले पाहिजे. त्याशिवाय तपासासाठी दोन आयएएस अधिका-यांची नियुक्ती केली पाहिजे. घोटाळ्यात तुमचा वाटा काय आहे? असेही त्यांनी विचारले. सिद्धरामय्या म्हणाले, हा व्यवहार भाजपच्या काळात झाला आहे. कायद्यानुसार ५०:५० या प्रमाणात जमीन दिली जाईल, असे सांगण्यात आले.

मात्र, मुडाच्या अधिका-यांनी जमीन निश्चित करून वाटणी केली. मुडाने ५०:५० च्या प्रमाणात तुम्हाला जमीन देऊ असे सांगितले. त्यांनी आम्हाला कायद्यानुसार जमीन दिली आहे. काँग्रेस नेते लक्ष्मण म्हणाले की, २००४ मध्ये केसरे गावातील ३.१६ एकर जमीन मल्लिकार्जुन यांच्या मालकीची होती. १९८८ मध्ये देवनूर बारंगेच्या बांधकामासाठी जमीन संपादित करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी त्यांना ही जमीन देणगीच्या कराराद्वारे दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR