नवी दिल्ली : ‘ब्लू व्हेल गेम’ मुलांच्या जीवावर उठली आहे. नुकतेच या गेमच्या नादात एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली आहे. त्यामुळेच सध्या मोबाईल सोशल मीडिया आणि गेमिंगपासून मुलांना दूर ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी केवळ पालकांचीच नाही तर शाळेची सुद्धा आहे. कारण मुले दिवसातील सहा-सात तास शाळेमध्ये असतात. त्यामुळे या मोबाईल आणि गेंिमग पासून कसे दूर राहतील हे पाहण्याचे कर्तव्य शिक्षकांचा सुद्धा आहे.
पालक आणि शिक्षकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मुलांना समजवताना तुम्ही त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारहाण करून ही गोष्ट सांगू नका असे केल्याने मुले अधिकच वात्रट होतील. आणि ते तुम्हाला घाबरणे सोडून देतील. मानसिक रोग तज्ज्ञ संजीव त्यागी यांनी सांगितले की मुले एकटी असणे, आत्मविश्वास नसणे, समाजाकडून शाळेकडून सतत नकारात्मक प्रतिक्रिया मुलांना मिळणे हे त्यांना सतत मोबाईल आणि गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यामुळेच शाळेत अभ्यासात कमी असणारी, पालकांसोबत जास्त न मिसळणारे, मित्रांच्यातही मिक्स न होणा-या मुलांना अधिक काळजी घेण्याची गरज असते. जी मुले दिवसा अस्वस्थ असतात आणि रात्री मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असतात. अशा मुलांची अधिक काळजी घ्यावी लागते.
पुण्यातही गेला एक बळी
हा एक असा खेळ आहे जो मुलांना तो खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो. मुले जेव्हा तो गेम खेळू लागतात तेव्हा ते त्यामध्ये गुंतू लागतात. मुलांच्या स्वभावात देखील बदल होतो. ते शांत राहू लागतात आणि एकटी राहू लागतात. गेमचा शेवट होईल तसे शेवटचा टास्क हा इमारतीवरून उडी मारणे हा आहे. त्यामुळे मुले या गेमचा शिकार होत आहेत. त्याचा नुकताच एक बळी पुण्यात गेला आहे.
काय उपाय करावा?
– या गेमबाबत मुलांनी जर तुमच्याकडे विचारण्यात केली तर तुम्ही त्यांना सर्व माहिती द्या.
– मुलांसाठी ही गेम कशी हानिकारक आहे हे सांगा.
– तुमची मुले इंटरनेटवर काय पाहतायत काय करतायेत हे पहा.
– मुले एकटीच बसायला लागली रात्रीचा जागरण करायला लागली तर त्यांच्याकडे लक्ष द्या.
– मुलांच्या दिवसभराच्या रूटीनमध्ये जर फरक पडला तरीही काळजीच कारण असू शकते.
पालकांनी काय करावे?
– तुमच्या मुलाची झोप पूर्ण होत नसेल. तर तो नक्कीच रात्री जागरण करत असेल. अशावेळी काळजीचे कारण असू शकते.
– मुल दिवसभर मोबाईलला चिटकून बसले असतील किंवा टीव्हीवर हॉरर पिक्चर बघत असतील. तसेच, पहाटे उठून भीतीदायक व्हीडीओ बघत असतील.किंवा ते हातावर कापून घेत असतील. त्याचे फोटो शेअर करत असतील तर ही धोक्याची घंटा असू शकते.
– कारण, या गेममध्ये स्वत:ला इजा करून घ्या आणि त्याचे फोटो अपलोड करा. असे स्पष्ट सांगण्यात येते. त्यामुळे मुले अशी काही प्रयोग करत आहेत का याकडे सुद्धा लक्ष द्या.