32.5 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रनारळपाणी महागले

नारळपाणी महागले

भंडारा : प्रतिनिधी
उन्हाळ्याची चाहूल लागली की, थंड पेयासोबतच नारळपाण्यालाही मागणी वाढते. त्यामुळे आपोआपच नारळाचे भाव वाढतात. नारळपाणी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे आता एका नारळामागे १० रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या कार्यक्रमात हजेरी लावणा-यांचा घसा कोरडा पडतो. परिणामी, अनेकजण थंड पेयाबरोबरच नारळपाणी घेण्यावर भर देतात. त्यामुळे नारळपाण्याच्या किमतीमध्ये वाढ होत असते.

उन्हाळ्याची चाहूल लागताच नारळाचा पुरवठा आपोआपच कमी होत जातो. परिणामी, मागणी अधिक होऊन बाजारपेठेत त्याचे दरही वाढत जातात.
फेब्रुवारी महिना संपल्यानंतर उन्हाचा कडाका जाणवायला सुरुवात होते. यादरम्यान, धार्मिक कार्यक्रम आणि लग्न समारंभही मोठ्या संख्येने असतात. त्याचाही परिणाम या नारळावर होत असतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR