24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयराज्यासह देशभरात थंडीची लाट!

राज्यासह देशभरात थंडीची लाट!

अवकाळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये धुके आणि थंडीची लाट कायम आहे. दिल्लीतील तापमान ४ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. राजधानीत दाट धुके आणि शून्य दृश्यमानता यामुळे अनेक विमान उड्डाणे आणि रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये कोल्ड वेव्ह अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर आज १८ जानेवारीला बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणांवर हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्किममध्ये विविध ठिकाणांवर गारपीट होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, तामिळनाडूच्या दक्षिण भागांमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुढील दोन ते तीन दिवस म्हणजेच १८-२१ जानेवारी दरम्यान देशातील विविध भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान, झारखंड, उप-हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये दाट धुक्यांची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्येही थंडी कायम राहणार आहे.

उत्तरेकडून येणा-या वा-याच्या प्रभावाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या ४८ तासांपासून राज्यातील अनेक भागांत थंडीची लाट दिसून येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR