22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीमुलांचे कोलमडणारे भावविश्व चिंतेची बाब : धानोरकर

मुलांचे कोलमडणारे भावविश्व चिंतेची बाब : धानोरकर

परभणी : मुलांना वाचन, निसर्ग, संगीत आदींबाबतचे अनुभव अनेक घरांमधून दिले जात नसल्याने मुले टीव्ही, मोबाईल, कार्टून, दंगामस्ती या सोबत ती आत्मकेंद्रीत्कडे जात आहेत. ते पाहता मुलांचे कोलमडणारे भावविश्व अतिशय चिंतेची ज्वलंत समस्या बनू पाहत आहे. हीच मुल उद्या वेगवेगळ्या पदांवर काम करणार आहेत. निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. मग त्यांना इतरांचे मन, संवेदना समजतील का. यासाठी वेळीच उपाययोजना करावी असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.

शहरातील पाथरी रोड येथील अरबिंदो अक्षरज्योती विद्यालय येथे पालक मेळावा घेण्यात आला. यात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. मुलांच्या भावना जाणून घेण्यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्यास उपजिल्हाधिकारी धानोरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अरबिंदो अक्षरज्योती विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR