हिंगोली : महायुती आणि शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ येथे आयोजीत केलेल्या सभेत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच आमदार संजय बांगर यांनी आला बाबुराव आता आला बाबुराव हे गीत गायले.
महायुतीचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ हिंगोलीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. दरम्यान येथील शिवसेनेचे आमदार संजय बांगर यांनी बाबुराव कदम यांच्याविषयी भाषण करताना लोकगीता संदर्भ देत शांता गेली शालू गेली आता कोणाचं नाव, आला बाबुराव आता आला बाबुराव असे गीत म्हटल्याने एकच हशा पिकला.