27.3 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रआ. दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन

आ. दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबन

मुंबई : विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना मोठा धक्का बसला असून विधान परिषद अध्यक्षांनी दानवे यांच्यावर ५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे दानवे यांना शिवराळ भाषा चांगलीच भोवली असल्याचे म्हटले जात आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी विधानपरिषदेत खडांजगी झाली होती. यावेळी आंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप, प्रसाद लाड यांनी केला होता.

त्यानंतर आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसाद लाड यांनी विधानसभेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. त्यावेळी त्यांना दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापला होता. दरम्यान मंगळवार दि. २ जुलै रोजी दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी निषेधाचा प्रस्ताव मांडला होता. प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव मंजूर करुन तो लोकसभेत पाठवा, अशी मागणी केली होती. त्याचवेळी या प्रस्तावावर आक्षेप घेऊन विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी आक्रमक भूमिका घेत बोलायला उभे राहिले. त्याचवेळी लाड यांनी त्यांच्याकडे हातवारे केले. या कृतीने यावेळी दानवे संतापले आणि त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली. या प्रकरणानंतर कामकाज तहकूब करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR