मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली. आता आजारपणानंतर श्रेयस तळपदे पुन्हा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. श्रेयसच्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
श्रेयसने शेअर केले पोस्टर
श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरला त्याने कॅप्शन दिले, नव्या वर्षाची सुरूवात एका नव्या को-या मराठी सिनेमाने ‘झी स्टुडिओ’ प्रस्तुत करीत आहेत, महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी ‘ही अनोखी गाठ’.
ही अनोखी गाठ हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात श्रेयससोबत गौरी इंगवले देखील काम करणार आहे.