26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रआत्मविश्वासाने जग जिंकता येते : संजय घोडावत

आत्मविश्वासाने जग जिंकता येते : संजय घोडावत

पुणे- ‘जगात असाध्य अशी कुठलीही गोष्ट नाही, उच्च ध्येय, पराभवासोबत टीका पचवण्याची क्षमता, कामगिरीतील सातत्य या गोष्टी आत्मसात केल्यास आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करता येते. दुस-यांशी स्पर्धा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करताना दुर्दम्य आत्मविश्वास बाळगल्यास जगही जिंकता येते,’ असे मत संजय घोडावत समूहाचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांनी व्यक्त केले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्­नॉलॉजी विद्यापीठ, विश्­वराजबाग, पुणे येथे प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन(पेरा) द्वारे आयोजित ‘पेरा’ प्रीमिअर चॅम्पियनशिपच्या पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी बोलत होते.

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष एकनाथ खेडकर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघाची खेळाडू स्नेहल शिंदे-साखरे, ‘एमआयटी एडीटी’विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, ऑलिम्पियन बॉक्­सर मनोज पिंगळे, डॉ. मोहित दुबे, डॉ. वीरेंद्र शेटे, डॉ. अतुल पाटील, प्रा.डॉ. मोहन मेनन आदी याप्रसंगी उपस्थित होते. विश्­वशांती प्रार्थनेने प्रारंभ झाल्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुराज भोयार यांनी केले तर आभार ‘पेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हनुमंत पवार यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR