28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर संभ्रम

मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर संभ्रम

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी शहर आणि जिल्ह्यातील उमेदवारांची यादी हळूहळू जाहीर होत असल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असल्याचे दिसते आहे. पुणे, शिरूर, बारामती मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट होत असले तरी त्या तुलनेत मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत ठोस निर्णय झालेले दिसत नाहीत.

बारामती लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारे यांचा निवडणूक लढण्याचा निर्धार ठाम असल्याचे दिसते. त्याबरोबर सुनेत्रा पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराची आघाडी सुरू केली आहे.

तर शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. पाच वर्षांपूर्वी या दोन उमेदवारांमध्ये लढत झाली होती.

पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तर काँग्रेस पक्षाकडून आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तसेच मनसेमधून बाहेर पडणारे वसंत मोरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. गाठीभेटी घेत उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

काँग्रेस पक्षात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असणा-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चर्चा सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. काँग्रेस पक्षात काहींनी उघडपणे नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षकार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेऊन एकदिलाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते एकदिलाने काम करतील असे चित्र निर्माण झाले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून काही कालावधी असला तरी या काळात प्रत्यक्ष भेटीवर अधिक भर देण्याबरोबर आगामी काळात केल्या जाणा-या प्रचाराचे, मेळावे, जाहीर सभा, कोपरा सभा, पदयात्रा याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR