29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो कुस्तीगीर उतरणार

मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो कुस्तीगीर उतरणार

पुणे (प्रतिनिधी)- मूळचे कुस्ती क्षेत्रात कार्यरत असलेले व आता भाजपा महायुतीकडून पुणे लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो कुस्तीगीर प्रचारासाठी उतरणार आहेत.

मोहोळ यांना लोकसभेसाठी संधी मिळाल्याने त्यांच्या विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार पुणे आणि परिसरातील कुस्तीगीरांनी एकदिलाने केला आहे. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी घर ना घर पिंजून काढू असाही निश्चय करत कृति आराखडाही तयार करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ म्हणाले, ‘लाल मातीशी नाते असणारा माझा परिवार एकवटला असून सर्वजण त्यांच्या पातळीवर प्रचारासाठी सज्ज आहेत. येत्या काही दिवसांत ८ ते ९ हजार कुस्तीगीर स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होणार आहेत.

दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात असणारे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे प्रचारासाठी कुस्तीगीर आहेत तर आमच्याकडे वस्ताद आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR