छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जनआक्रोश दुष्काळ मोर्चाला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात झाली.

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्च्यादरम्यान, सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच, कुंभमेळा आणि शक्तीपीठ महामार्गासाठी राखून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा निधी शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी वळवण्याची प्रमुख मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.
दुष्काळाच्या दाहकतेवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेतक-यांचे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. शेतमालाला भाव नाही, आणि मागच्या वर्षीचा माल घरात पडून असून त्याची कोणतीही सोय नाही. राज्य सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, महाराष्ट्राचे जे सुलतान आहेत, ते देवेंद्र फडणवीस बेफिकीर राहून भ्रष्टाचाराच्या नादी लागले आहेत. अशा या कुंभकर्णाला आता सर्वांनी मिळून झोपेतून जागे करण्याची आवश्यकता आहे.

कुंभमेळा आणि शक्तीमार्गाचा निधी शेतक-यांकडे वळवा
सपकाळ यांनी राज्य सरकारच्या मोठ्या प्रकल्पांवर आणि त्यातील निधीवर थेट आक्षेप नोंदवला. ते म्हणाले:
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार
कुंभमेळ्यासाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारने ही ३६ हजार कोटींची रक्कम तातडीने शेतक-यांकडे वळवावी.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा
शक्तीमार्गाचा (शक्तीपीठ महामार्ग) जो खटाटोप चालला आहे, तो सरकारने बंद करावा. त्यासाठी लागणारे ८० हजार कोटी रुपये हे शेतक-यांच्या कर्जमाफीकडे वळवण्यात यावेत.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
या जनआक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून काँग्रेसने राज्य सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतक-यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. राज्यातील सर्व शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्च्यात सहभागी झाले असून, पैठण गेटवरून सुरू झालेला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news