22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeधाराशिवएकमतने पुरोगामी विचार जपला

एकमतने पुरोगामी विचार जपला

धाराशिव येथे स्नेहमेळावा उत्साहात, विविध क्षेत्रातील ६१ जणांचा कृतज्ञता सन्मान एकमतच्या कृतज्ञता सन्मान सोहळ््यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे गौरवोद्गार

धाराशिव : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांनी समाजात एकमत घडविण्यासाठी एकमतची मुहूर्तमेढ रोवली. हा विचारच समाजाला एका वेगळ््या उंचीवर नेऊ शकतो. त्यामुळे अशा पुरोगामी विचाराची गरज आहे. हा विचार जपणारे एकमत हे वृत्तपत्र ३३ वर्षे पूर्ण करून ३४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. एकमतच्या स्थापनेपासून मी एकमतसोबत आहे. एकमतने कायम कसोसीने पुरोगामी विचार जपला. त्याबद्दल एकमतच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काढले.

एकमतच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त धाराशिव येथील सांजा रोड भागातील आर्यन फंक्शन हॉल येथे गुरुवारी (दि.२९) दुपारी ३ वाजता स्नेहमेळावा आणि कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आ. कैलास घाडगे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनक घोष, धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, भाऊसाहेब बिराजदार, अर्बन बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक विश्वासराव शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, विश्वनाथ तोडकर, सुभाष कोळगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे दैनिक म्हणून एकमतची ओळख आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी ज्या विचाराने एकमत सुरू केले, तोच विचार गेल्या ३३ वर्षांपासून जपत आहे. तसेच वृत्तपत्राच्या स्पर्धेतदेखील एकमतने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही मराठवाड्यात एकमतचा वाचक टिकून आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी सुरू केलेले हे वृत्तपत्र पुढील सुवर्ण महोत्सवी वर्षही साजरे करेल, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी एकमतच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ. कैलास घाडगे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनक घोष, धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, विश्वास शिंदे, व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वेद्यकीय, व्यावसायिक, उद्योग, प्रशासन, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक, सहकार आदी क्षेत्रातील ६१ जणांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. यावेळी एकमतचे जाहिरात व्यवस्थापक संदीप तिरुखे, नांदेड आवृत्तीप्रमुख चारुदत्त चौधरी, धनंजय शिंगाडे, विक्रम कातळे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकमतचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम यांनी केले. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले, तर आभार कळंब तालुका प्रतिनिधी सतीश टोनगे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शेक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व तालुका प्रतिनिधी, वार्ताहर, एकमतवर प्रेम करणारे वाचक, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR