24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरराजकारणात संधी मानून विकासकामावर भर दिला

राजकारणात संधी मानून विकासकामावर भर दिला

सोलापूर – राजकारणात आणि जनसेवेच्या कार्यात मिळालेल्या संधीचे सोने करीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले, असे प्रतिपादन महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव यांनी केले.

माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २२ मधील लिमयेवाडी आदिशक्ती माता चौक ते सलगर वस्ती पोलीस स्टेशनपर्यंत ३३ लाख ५७ हजार रुपये खर्चाच्या नवीन ड्रेनेज लाइन कामाचा शुभारंभ सलगर वस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी जाधव बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या २०२२- २३ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत ड्रेनेज लाइनसाठी ३३ लाख ५७ हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून हे काम करण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक नागेश गायकवाड, चेतन गायकवाड, मोहन जाधव, अंबादास जाधव, आर. के. गायकवाड, लालप्पा गायकवाड, दीपक जाधव, रमेश जाधव, लक्ष्मण जाधव, सतीश गायकवाड, शशिकांत गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR