24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रबर्दापूर येथे मठाधिपतींच्या निवडीवरून वाद

बर्दापूर येथे मठाधिपतींच्या निवडीवरून वाद

पाच जणांना काठ्या, विटाने मारहाण

अंबाजोगाई : प्रतिनिधी
तालुक्यातील बर्दापूर येथील श्री गुरु महालिंगस्वामी मठाच्या नवीन पदाधिका-यांची निवड शुक्रवारी दुपारी होती. या निवडीसाठी तुम्ही मठात का आलात? या कारणावरून मठातील भक्तांना जुने मठाधिपती व त्यांच्या सहका-यांनी काठ्या आणि विटांनी मारहाण करून पाच जणांना जखमी केले. या पाचही जणांवर बर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

दरम्यान, तालुक्यातील बर्दापूर येथे श्रीगुरु महालिंगस्वामी मठ आहे. या मठाच्या निवडीचा वाद धर्मादाय आयुक्त व विविध न्यायालयांकडे होता. न्यायालयाने नवीन मठाधिपतींची निवड करण्याचे आदेश दिले. मात्र शक्रवारी दुपारी वकील असलेले शरद प्रभाकर चौधरी हे बर्दापूर येथील मठात गेले होते. ते दर्शन घेऊन मठात बसलेले असताना तिथे भक्त शैलेस शिवाजीराव महाजन, आशिष बाळासाहेब महाजन, आशिष बाबासाहेब महाजन, जयशंकर महाजन, शेखर महाजन व मल्लिकार्जुन सौंदळे सर्व रा. सोनपेठ होते.

यावेळी बाहेर जमलेली गर्दी पाहण्यासाठी गेले असताना तिथे अंगद जानकर, अविनाश आनकर, पप्पू देवकते, अविनाश घोडके, मोईन चांद शेख, सागर गंडले, मिठाराम जानकर, अजय जानकर, सचितानंद ऊर्फ चनबसव शिवाचार्य रेवनसिद्ध हिरेमठ रेवनसिद्ध यांचा मुलगा व शिवाजी चिल्लरगे, रा. तत्तापूर हे आले. या सर्वांनी मिळून हातातील काठी व लोखंडी पाइप व विटाने शरद चौधरी, आशिष महाजन, शैलेश महाजन यांना मारहाण केली. तिथे भांडण सोडविण्यासाठी आलेल्यांनाही डोक्यात काठ्या मारून व विटा फेकून जखमी केले. यातील जखमी व्यक्तीना उपचारासाठी बर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर शरद प्रभाकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध बर्दापूर पोलिस ठाण्यात मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR