26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये दर्ग्यावरून वाद

नाशिकमध्ये दर्ग्यावरून वाद

हिंदू संघटनांची हनुमानाचे मंदिर बनवण्याची मागणी

नाशिक : प्रतिनिधी
काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणा-या मार्गावर हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे. या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, महंत सुधीरदास पुजारी दाखल झाले. यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांची धरपकड सुरू आहे.

दरम्यान, हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की, हा दर्गा अवैध आहे. त्यामुळे तो तोडला पाहिजे. या जागी हनुमानाचे मंदिर बनवले पाहिजे. सकल हिंदू समाजाचे या दर्ग्यावरून सतत विरोध प्रदर्शन सुरू आहे. नाशिकमध्ये जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून त्या ठिकाणी दर्गा बांधला आहे असे हिंदू समाजाच्या लोकांचे म्हणणे आहे.

सकल हिंदू समाजाच्या लोकांनी दर्ग्यावर जाऊन मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्याची योजना आखली आहे. नाशिक पोलिसांना या आंदोलनाची पूर्वकल्पना आल्यामुळे त्यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. हिंदू समाज संघटनांकडून होत असलेला विरोध आणि या विरोधातील आंदोलनामुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. पोलिसांनी या संपूर्ण परिसरात घेरावबंदी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR