34.4 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeलातूरमांजरा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच बिनविरोध निवड

मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच बिनविरोध निवड

व्हाइस चेअरमनपदी अशोकराव काळे पाचव्यांदा दिलीपराव देशमुख यांची चेअरमनपदी निवड

लातूर : देशात व राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदा रीत नावलौकिक असलेल्या शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या लातूर विलासनगर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख तर व्हॉईस चेअरमनपदी संचालक अशोकराव काळे (चिकुर्डा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून बिनविरोध निवडून येण्याची परंपरा असलेल्या मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख हे पाचव्यांदा चेअरमन म्हणून निवड झाली असून ते सलग १९८५ पासून मांजरा साखर कारखान्याचे संचालक ४० वर्षापासून आहेत हे विशेष आहे.

मांजरा कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली नुतन संचालक मंडळाची चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर बदनाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि २८ एप्रिल २०२५ रोजी बैठक संपन्न झाली चेअरमन पदासाठी दिलीपरावजी देशमुख व व्हॉईस चेअरमन पदासाठी अशोक काळे यांचे एकेक अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

इतर साखर कारखान्यापेक्षा जास्त मांजरा परिवारातील साखर कारखाने पुढील हंगामात अधिक भाव देणार : माजी मंत्री दिलीपराव देशमुख

यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की सर्वसामान्य शेतकरी आपल्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो शेतकऱ्यांचे हित आपण सर्वजण पाहतो या मागच्या हंगामात मांजरा परिवारातील साखर कारखान्याने जो भाव शेतकऱ्यांच्या उसाला दिला त्यापेक्षा अधिकचा भाव पुढच्या हंगामात देऊ विकास हा कधी थांबत नसतो तो सातत्याने करत राहावा लागतो कारखान्याची नेहमी परीक्षा असते ऊस कमी झाला तरीही व ऊस अधिक झाला तरी मांजरा परिवारातील साखर कारखान्याला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मदत करते असे त्यांनी सांगून चेअरमन पदाची संधी दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळ शेतकरी सभासदांचे आभार व्यक्त केले.

मराठवाडा विदर्भात मांजरा परिवार पहिल्या स्थानावर : माजी मंत्री आमदार अमित देशमुख

या प्रसंगी कारखान्याचे संचालक आमदार अमित देशमुख यांनी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मांजरा परिवारातील साखर कारखाने यशस्वी वाटचाल करत आहेत. योग्य नियोजन व प्रामाणिक हेतू अंगीकारून मांजरा कारखाना यापुढे देखील आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आदरणीय साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून कार्य करत अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला असून राज्यात मराठवाडा व विदर्भात मांजरा साखर परिवार अधिक भाव व उसाचे गाळप करण्यात अव्वल स्थानावर असल्याचे सांगीतले.

यावेळी नूतन व्हॉईस चेअरमन अशोकराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन श्रीशैल्य उटगे यांनी मानले
याप्रसंगी माजी आमदार तथा विलास कारखाना व्हाइस चेअरमन वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,रेणा साखरचे चेअरमन अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष अँड प्रविण पाटील, संत शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, २१ शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष देशमुख,शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, विलास बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, मांजरा साखर कारखान्याचे नूतन संचालक श्रीशैल्य उटगे,मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत उफाडे,कैलास पाटील,धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरू कदम, सदाशिव कदम, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, निर्मला चामले, छायाताई कापरे, शंकर बोळंगे,अनिल दरकसे, कार्यकारी संचालक पंडीत देसाई, आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR