28.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeराष्ट्रीयउमर खालिदचा कोर्टाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळला

उमर खालिदचा कोर्टाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याचा जामीन अर्ज आज दिल्लीच्या कारकरदुमा कोर्टाने फेटाळला. दिल्लीतील २०२० मधील दंगल प्रकरणातील तो आरोपी आहे. या प्रकरणात नियमित जामिनासाठी त्यानं अर्ज केला होता. दुस-यांचा त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

कडकडडुमा कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश समीर वाजपेयी यांच्या कोर्टाने उमर खालीदचा जामीन फेटाळला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये ट्रायल कोर्टाने उमर खालीदचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने त्याने पुन्हा नव्याने याचिका दाखल केली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये जामीन देण्यास नकार दिल्याच्या आदेशाला खालीदने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते.

उमर खालीदवर काय आहेत आरोप?
दिल्लीमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये दंगल झाली होती. या दंगलीचा कट उमर खालीदसह इतरांनी रचल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या दंगलीत ५३ जण ठार झाले होते तर ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका उमर खालीदवर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR