23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंसह १३ आयोजकांविरुद्ध गुन्हा

मनोज जरांगेंसह १३ आयोजकांविरुद्ध गुन्हा

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे मराठा समाजाला सगे सोय-यांसह आरक्षण मिळावे, या मागणीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सार्वजनिक बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबाजोगाई येथे बुधवारी झालेल्या बैठकीत मनोज जरांगे यांनी खोटे व प्रभोषक भाषण करून राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह १३ आयोजकांविरुद्ध अंबाजोगाई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे असलेल्या साधना मंगल कार्यालयात बुधवारी (१४ मार्च) रात्री ८ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, जरांगे यांना येण्यासाठी उशीर झाला आणि ही बैठक रात्री १० वाजेनंतरही सुरुच होती. त्यामुळे रात्री १० च्या नंतर ध्वनिक्षेपक चालू ठेऊन बैठकीसाठी दिलेल्या परवान्याचे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोप पोलिसांनी केला आहे.

आयोजकांविरुद्ध गुन्हा
मनोज जरांगे यांच्यासह सार्वजनिक बैठकीचे आयोजन करणारे आयोजक सचिन सुभाषराव जोगदंड, राजेसाहेब देशमुख, अ‍ॅड. माधव जाधव, अमर देशमुख, अजित गरड, रणजीत लोमटे, अमोल लोमटे, राहूल मोरे, अ‍ॅड. जयसिंग सोळंके, अ‍ॅड. किशोर देशमुख, भिमसेन लोमटे आणि साधना मंगल कार्यालयाचे मालक रवीकिरण श्यामसुंदर मोरे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनमध्ये भादंवि ५०५ (१)(ब), १८८, सह कलम म.पो.का १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR