29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजन‘योध्दा’ पाहून कियाराने केले पती सिध्दार्थचे कौतुक

‘योध्दा’ पाहून कियाराने केले पती सिध्दार्थचे कौतुक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुन्हा एकदा देशभक्तीपर चित्रपट घेऊन आला आहे. ‘शेरशाह’नंतर सिध्दार्थ ‘योद्धा’ हा चित्रपट घेऊन आला आहे. ‘योध्दा’मध्ये सिध्दार्थने आर्मी मॅनची भूमिका साकारली असून या अ‍ॅक्शन थ्रिलरची सिध्दार्थच्या चाहत्यांना खूप प्रतीक्षा होती. करण जोहर निर्मित ‘योद्धा’ अखेर आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘योध्दा’ला समीक्षक आणि प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर आता सिद्धार्थची पत्नी कियारा अडवाणीने या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रदर्शनापूर्वी ‘योध्दा’चा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. त्याला बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. तर सिध्दार्थची पत्नी अभिनेत्री कियारा अडवाणीने प्रीमियरमध्ये ‘योद्धा’ पाहिला आणि या चित्रपटाबद्दल कियाराने तिच्या पतीचे खूप कौतुक केले आहे. कियाराने चित्रपटातील एका दृश्यातील सिद्धार्थचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून. फोटोसोबत कियाराने लिहीले की सिद्धार्थ तुझा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. तू सर्वोत्तम आहेस, असे कियाराने म्हटले आहे.

सिद्धार्थसोबत, कियारानेही चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, ‘योद्धा’मध्ये सिद्धार्थने एका लष्करी अधिका-याची भूमिका साकारली आहे, जो आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि धैर्याच्या जोरावर अपहरण झालेल्या विमानातील प्रवाशांना मदत करून दहशतवाद्यांशी लढतो. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, सिध्दार्थच्या अभिनयाचे चाहते कौतुक करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR