22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रक्रूझर-टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू

क्रूझर-टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू

पुणे : वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुके पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्याजवळील मंचर येथे एक भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीची पुढे चाललेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक बसून ही दुर्घटना घडली. यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. चालक पंकज खंडु जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी अहिरे (रा. जायखेडा तालुका सटाणा) अशी मृतांची नावे आहेत. क्रूझरमधील सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील सायखेडा गावातील असून ते भोसरी येथे नातेवाईक यांना भेटण्यासाठी चालले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR