जळगाव : आज धनत्रयोदशी आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे आज धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेफार का होईना सोने खरेदी करून त्याचे घरात पूजन करणे शुभ असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच भावनेतून आज धनत्रयोदशी दिवशी देशातली सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच आज सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी ही दिसून आली.
ग्राहकांच्या गर्दीमुळे सुवर्णनगरी आज चांगलीच गजबजल्याच पाहायला मिळालं. गेल्या वर्षी सोन्याचे भाव हे पन्नास हजार रुपये पर्यंत होते हेच भाव आता यावर्षी दुप्पट झाले असून यंदा सोन्याचे भाव हे साठ हजारापर्यंत पोहोचले आहे. सोन्याच्या दारात दुप्पट वाढ झाली असतानाही मात्र आज मुहूर्तावर सोन खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या भावात वाढ झालेली असतानाही ग्राहकांचा सोने खरेदीकडे विशेष कल आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षकाच्या डिझाईन मध्ये सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहे, तसेच लक्ष्मीपूजन लक्षात घेता चांदीची लक्ष्मी चांदीचा लक्ष्मीची शिक्के सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले असून हे खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे.