सायबर फसवणुकीतील म्युल बँक अकाउंट रॅकेटचा पदार्फाश

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत्या सायबर आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत म्युल बँक अकाउंट रॅकेटचा पदार्फाश केला आहे. या प्रकरणी २ आरोपींविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान सुमारे १९.४१ लाख रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा मागोवा लागला आहे.

पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकासमोरील गवळीपुरा परिसरात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याची ओळख हर्षदसिंह राजूसिंह अरोरा (रा. बु-हाणपूर, मध्य प्रदेश) अशी झाली. त्याच्याकडून ६० विविध बँकांची पासबुक, एटीएम कार्डे, विविध कंपन्यांची ८ सिमकार्डे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपासात बालाजी सोपान गुंजाळे (रा. बळीरामपूर) याचा सहभाग समोर आला असून तो आरोपी हर्षद सिंह अरोरा याला खातेधारक उपलब्ध करून त्याचे बँक खाते व एटीएम काढून देत होता.

प्राथमिक तपासात आरोपी नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने विविध बँकांमध्ये खाती उघडत होते. ही खाती सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी वापरली जात असल्याचे उघड झाले. एनसीसीआरपी पोर्टल आणि मनी ट्रेल विश्लेषणातून देशभरातील ऑनलाइन गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटसह विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीतील रक्कम या खात्यांमधून फिरवल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी प्रत्येक खात्यामागे कमिशन स्वीकारत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (सी) व ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news