27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रसायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा धक्का

सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा धक्का

पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा धक्का बसला. पुणे येथील रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले की, ८२ वर्षीय पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा धक्का बसला. आता त्यांची प्रकृतीती सुधारणा झाली आहे.

रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले की, डॉ. सायरस पूनावाला यांना १६ नोव्हेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने त्यांना रुबी हॉल येथे दाखल करण्यात आले. शुक्रवारी पहाटे सायरस पुनावाला यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल. डॉ. पुनावाला यांची तब्येत सध्या चांगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR