22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रदादा आता सीनियर सिटीजन झालेत

दादा आता सीनियर सिटीजन झालेत

खासदार सुप्रिया सुळेंचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अजित पवार रोहित पवारांना ‘बच्चा’ म्हणाले. यावरच आता खासदार (शरद पवार गट) सुप्रिया सुळे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचा दादा रोहितपेक्षा वयानं खूप मोठा आहे. दादा हा रोहितचा काका आहे. थोडं काही बोलले तर रोहितनं कशाला मनाला लावून घ्यायचे. तसेच अजित दादांचं वय सध्या ६५ तर रोहितचे वय ४० आहे. त्यामुळं काकांनी काही बोललं तर इट्स ओके. दादा आता सीनियर सिटीजन आहेत.

अजित पवार मित्रमंडळ भाजपाच्या चिन्हावर लढणार अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. तर अजित पवार यांनी या टीकेवर बोलताना रोहित अजून बच्चा आहे, असं म्हटले होते. तसंच रोहित पवारला माझे कार्यकर्ते उत्तर देतील, त्याला उत्तर द्यायला तो इतका मोठा झालेला नाही, असंही ते म्हणाले होते.

दरम्यान, अजित पवार गटाच्या मुंबई विभागाचा कार्यकर्ता संवाद मेळावा रविवारी (७ जानेवारी) कल्याणमध्ये पार पडला. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले की, वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय ७५ झालं की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळं अजित पवारांच्या या टीकेवरुनच सुप्रिया सुळे त्यांना ‘सीनियर सिटीजन’ म्हणाल्या असाव्यात, असं बोललं जातंय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR