30.8 C
Latur
Saturday, May 3, 2025
Homeमहाराष्ट्रपुढील २ दिवसांत लाडक्या बहिणींचा हप्ता

पुढील २ दिवसांत लाडक्या बहिणींचा हप्ता

मंत्री तटकरे यांची माहिती मार्चच्या हप्त्याविषयी चुप्पी

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्याची राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतीक्षा आहे. दरम्यान मार्च महिन्याचा उल्लेख टाळत एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहि­णींच्या खात्यात येत्या २ ते ३ दिवसांत जमा होईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार दि. २ मे रोजी येथे दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहि­णींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण १२००० रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा ५०० रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे असे आदिती तटकरे म्हणाल्या.

तांत्रिक कारणामुळे हप्ता थकला?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जातात. मात्र, यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता येत्या २ ते ३ दिवसांत मिळतील. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याची माहिती आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता हफ्ता थकण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR