35.9 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeनांदेडप्रयागराज येथे गेलेल्या सरसम येथील भाविकाचा मृत्यू

प्रयागराज येथे गेलेल्या सरसम येथील भाविकाचा मृत्यू

हिमायतनगर : प्रतिनिधी
सरसम बु येथील शेतकरी दिगांबर भुसारे वय ६५ वर्ष हे प्रयागराज येथे मौनी अमावस्येनिमित्त शाही स्रान व देवदर्शनासाठी गेले असता प्रकृती खालावल्याने त्यांचे उपचारादरम्यान दिनांक २९ रोजी निधन झाले होते. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेतकरी दिगांबर भुसारे वय ६५ वर्ष हे प्रयागराज येथे मौनी अमावस्ये निमित्त शाहीस्रान व देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान तेथील गर्दी पाहून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ तेथील शासकीय रुग्णालय प्रयागराज येथे अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दिगंबर भुसारे यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सुन, नातु, पंतु असा मोठा परीवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR