24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयगाझातील मृतांची संख्या २० हजारांच्या पुढे

गाझातील मृतांची संख्या २० हजारांच्या पुढे

तेल अवीव : इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या ७५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबरपासून गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या २०,००० वर पोहोचली आहे, हमासने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये ८,००० हून अधिक मुले आणि ६,२०० महिलांचा समावेश आहे, तर ५२,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि इतर ६,७०० बेपत्ता आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात एकूण ३१० वैद्यकीय कर्मचारी, ३५ नागरी संरक्षण कर्मचारी आणि ९७ पत्रकार मारले गेले आहेत.

दरम्यान, पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, हेब्रॉन आणि बेथलेहेम या वेस्ट बँक शहरांमध्ये इस्रायली सैनिकांशी झालेल्या संघर्षात दोन पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, हमासने ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर केलेल्या अचानक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायल गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला करत आहे. हमासच्या या हल्ल्यात सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि २०० हून अधिक लोकांना हमासने ओलीस ठेवले होते.

गेल्या दोन दिवसांत इस्रायली लष्कराने आपली लष्करी कारवाई तीव्र केली आहे. या काळात आयडीएफने खान युनिसमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एका दहशतवाद्याने रणगाडाविरोधी आरपीजी क्षेपणास्त्रे डागली, शेजय्या येथील शाळेजवळील एका वैद्यकीय क्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. यासह इस्रायली सैनिकांनी दक्षिण गाझामधील समुद्रकिना-याजवळील बोगद्याचा शाफ्ट नष्ट केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR