22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमृतांची संख्या २००० वर

मृतांची संख्या २००० वर

पापुआ न्यू गिनीमध्ये दरड कोसळली

यांबली : इंडोनेशियाच्या सीमेला लागून असलेल्या पापुआ न्यू गिनीमध्ये शुक्रवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत २०००च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली.

दरड कोसळल्याचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ही दरड एवढी मोठी होती की त्यातून खाली आलेल्या मलब्याखाली शेकडो घरे जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातील संयुक्त राष्ट्राकडून रविवारी मृतांची संख्या ६७० देण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी पापुआ न्यू गिनीच्या नॅशनल डिझास्टर सेंटरने यूएनला लिहिलेल्या पत्रामध्ये ही संख्या २००० च्या वर गेल्याचे नमूद केले आहे. शुक्रवारी यांबलीमधल्या शेकडो घरांव बाजूच्या डोंगराचा एक मोठा हिस्सा कोसळला. या भागात जवळपास ४ हजार नागरिक राहात होते, अशी माहिती पापुआ न्यू गिनीमध्ये आणीबाणीच्या स्थितीत बचावाची जबाबदारी असणा-या केअर या संस्थेचे संचालक मॅकमोहन यांनी माध्यमांना दिली.

बचावकार्यात अडथळे
या भागातील भौगोलिक स्थितीमुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. या भागातील भौगोलिक रचनेत वारंवार बदल होत असून दुर्गम भागामुळे स्थिती अधिक गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे बचावकार्यासाठीचं पथक इथे पोहोचण्यास घटनेनंतर दोन दिवस लागले, असे घटनास्थळी दाखल झालेल्या यूएनच्या पदाधिका-यांनी सांगितले.

आदिवासी समूहाकडून अडथळे
संयुक्त राष्ट्राच्या पथकांकडून स्थानिक आदिवासी समूहाकडून बचावकार्यात अडथळे आणले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या आदिवासी गटांमध्ये आपापसांत होणा-या हिंसक घटनांमुळे बचावपथक व बचावसाहित्य घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे या साहित्याला पूर्ण मार्गावर लष्करी सुरक्षेत ने-आण करावी लागत आहे असेही यूएनच्या पथकांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR