26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रमृृतांचा आकडा १३ वर; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

मृृतांचा आकडा १३ वर; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरण आतापर्यंत तिघांना अटक

डोंबिवली : डोंबिवलीतील स्फोटामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून अमुदान केमिकल्स कंपनीच्या दोन्ही मालकांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केलीये. मलया मेहता असे मालकाचे नाव असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास आता ठाणे गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान मेहता यांची आई मालती मेहता यांनाही आज नाशिक इथून अटक करण्यात आली आहे.

आता ८ मृतदेहाचीच डीएनए चाचणी केली जाणार आहे. डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान डोंबिवलीतील एमआयडीसी हद्दीतील अमुदान केमीकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये गुरुवारी अचानक स्फोट झाल्याने त्यात आतापर्यंत १३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ६४ जण जखमी झाले आहेत. प्रदीप मेहता वय ३८ वर्षे यास गुन्हे शाखेने आधीच ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना देखील गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांना नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले होते.

त्यांची आता चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांच्याकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटानंतर आग लागली होती. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलांचे जवान दाखल झाले होते. ढिगा-याखालून लोकांना काढण्यात आले. या प्रकरणात मालती मेहता या मुख्य आरोपी आहेत. मालती मेहता हे अमुदान कंपनीचे मालक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR