29.1 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रदख्खनच्या ‘ताज’ची दुरावस्था

दख्खनच्या ‘ताज’ची दुरावस्था

मकबरा, मिनारे कोसळण्याच्या अवस्थेत

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छ. संभाजीनगर येथील जगप्रसिद्ध बीबी का मकब-याच्या संवर्धनाच्या योजनेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली आहेत. येथील चारही मिनारांची जागोजागी पडझड झाली आहे. ‘दख्खनचा ताज’, ‘मिनी ताज’ अशी ओळख असलेला हा मकबरा आणि मिनार कोसळण्याचीच वाट पाहिली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

बीबी का मकब-यावर पर्यटकांच्या गर्दीचा, प्रदूषणाचा आणि तिन्ही ऋतूंचा काही परिणाम होत आहे का, याचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला. या अभ्यासाअंती मकब-याच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजनांसाठी पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या योजनां अमलात आणल्या गेल्या नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्वेकडील मिनारचा मोठा भाग कोसळला होता. अशीच घटना शनिवारी १५ जून रोजी घडली.

चारही मिनारचे टप्प्याटप्प्यात संवर्धन केले जाणार आहे. मिनारच्या प्लास्टरसाठी चुन्यासह गूळ डिेक, उडीद डाळ, विटांची पावडर वापरण्याचे नियोजन आहे. मात्र, मंजुरी, निधी, काम करणारी एजन्सी निश्चित होणे यातच दोन वर्षे लोटली.
मुख्य मकब-यासह चारही मिनारची जागोजागी पडझड झाली आहे. प्लास्टर निखळले आहे. जागोजागी भेगा पडल्या आहेत. नक्षीकामही जागोजागी उखडून गेले आहे. जागोजागी मकबरा काळवंडला आहे.

‘ताजमहाल’च्या धर्तीवर हवी योजना
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने आग्रा येथील ताजमहालच्या पृष्ठभागाचे साचलेल्या प्रदूषकांपासून संरक्षण करण्यासाठी वैज्ञानिक स्वच्छता आणि संवर्धन योजना तयार केली. अशीच योजना बीबी का मकब-याच्या संवर्धनासाठी राबविण्याची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR