मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सोमवारी कॅबिनेट बैठक बोलावण्यात आलेली असून या बैठकीमध्ये विधानसभेच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत.
राज्यातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायीच्या दुधाची मानवी उपयुक्तता,आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायीबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
देशी गायींच्या बाबतीत सरकारने निर्णय जाहीर केला असून त्यामाध्यमातून गायींचे संवर्धन होणे ही अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे देशी गायींच्या संबंधाने कोणते नियम असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारी तिजोरीवर १०० कोटी रुपयांचा भार
कर्मचा-याचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती उपदान १४ लाखांवरुन २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तीन वर्षांमध्ये सरकारी तिजोरीवर १०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर कर्मचा-यांना खूश करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.