23.4 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeक्रीडापंजाबला नमवित दिल्लीचा ६ गड्यांनी विजय

पंजाबला नमवित दिल्लीचा ६ गड्यांनी विजय

दिल्ली पाचव्या स्थानावर कायम

जयपूर : आयपीएलच्या ६६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या पीबीकेएसला टॉप-२ मध्ये स्थान मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीने लीग टप्प्यात १५ गुणांसह पाचव्या स्थानावर राहून अंतिम फेरी गाठली.

शनिवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर दिल्लीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने ८ विकेट्स गमावल्यानंतर २०६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ५३ आणि मार्कस स्टॉइनिसने ४६ धावा केल्या. दिल्लीने १९.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. समीर रिझवीने अर्धशतक झळकावले. करुण नायरने ४४ धावा केल्या.

संघाकडून मुस्तफिजूर रहमानने ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या १८ व्या मोसमातील ६६ व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असताना हंगामी कर्णधार फाफ डु प्लेसीस याने फिल्डिंगचा निर्णय करत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले. पंजाबने दिल्लीला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २०६ रन्स केले. दिल्लीसाठी श्रेयस व्यतिरिक्त मार्क्स स्टोयनिस याने १६ बॉलमध्ये ४ सिक्स आणि ३ फोरसह नॉट आऊट ४४ रन्स केल्या.

तर जोश इंग्लिस याने ३२ तर प्रभसिमरन सिंह याने २८ धावांचे योगदान दिले. दरम्यान समीर रिझवी याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्लसने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील शेवट विजयाने केला आहे. दिल्लीने पंजाब किंग्सवर ६ गड्यांनी शानदार विजय मिळवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR