28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयगाझाच्या अल शिफा रुग्णालयात विध्वंस

गाझाच्या अल शिफा रुग्णालयात विध्वंस

उत्तर गाझा : इस्रायलने गाझामध्ये कहर केला आहे. गाझावर सतत हल्ले करत आहे. रुग्णालयाचे देखील मोठे नुकसान होत आहे. इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान गाझातील सर्वात मोठे रुग्णालय अल शिफा येथील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २२ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांत रुग्णालयात ५५ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. रुग्णालयाचे डायरेक्टर मुहम्मद अबू सल्मिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल शिफा रुग्णालयात अजूनही ७००० हून अधिक लोक अडकले आहेत.

रूग्ण, मेडिकल स्टाफ आणि शेल्टर होममध्ये राहणा-या अनेक लोकांचा यामध्ये समावेश आहे. अल शिफा हॉस्पिटलच्या आत एक बोगदा असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. त्यामुळे इस्रायली लष्कर या रुग्णालयाला लक्ष्य करत आहे. इस्त्रायली लष्कराने अनेक दिवसांपासून येथे कारवाई केली आहे. अलशिफा हॉस्पिटल हे हमासचे मुख्यालय असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. अल शिफा रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे, तसेच हमासचा एक पिकअप ट्रकही येथे सापडला आहे. हमासने हॉस्पिटलमध्ये एके-४७, आरपीजी, ग्रेनेड आणि अनेक शस्त्रे लपवून ठेवल्याचा दावाही लष्कराने केला. मात्र, लष्कराच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हमासने इस्त्रायली ओलीस येथे लपविल्याचा दावाही आहे.

१२ हजारांहून अधिक मृत्यू
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले होते. या काळात १४०० इस्रायली लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इस्रायल सातत्याने हवाई हल्ले आणि जमिनीवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये गाझातील १२००० लोक मारले गेले आहेत. या हल्ल्यांमध्ये गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. येथून लाखो लोकांनी स्थलांतर केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR