16.9 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव

राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव

मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. मात्र यामुळे राज्यातील डेंग्यूचा प्रसारही वाढल्याची चिताजनक बाब समोर आली आहे. राज्यात दररोज, दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, डेंगीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात तिस-या स्थानी असल्याने चिंता वाढली आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती जारी केली आहे.
त्यानुसार १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १७ हजार ५३१ रुग्ण इतकी आहे. वर नमूद केल्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असून तेथे ३३ हजार ०७५ रुग्ण आहेत. तर बिहार दुस-या स्थानवर असू त्या राज्यात एकून १९ हजार ६७२ रुग्णसंख्या असल्याची आकडेवारी आरोग्य विभागातर्फे जारी करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यभराती लोकांच्या आरोग्यावर डासांमुळे होणा-या आजारांचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, देशभरातील रुग्णांच्या तुलनेत सात टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील ४ हजार ३०० रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. रिपोर्टिंग युनिटमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डेंग्यूच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव, त्यांचा उपद्रव वाढू नये यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी , असे आवाहनही करण्यात आहे.

चार वर्षांत सर्वाधिक प्रकरणे
गेल्या चार वर्षांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात या वर्षी सर्वाधिक रुग्ण आढळले असल्­याची माहिती आरोग्­य विभागाने दिली आहे. २०२० साली रुग्णसंख्या ३ हजार ३५६ होती तर २०२१ साली राज्यातील रुग्णांचा आकडा १२ हजार ७२० इतका होता. २०२२ साली राज्यात डेंग्यूचे ८ हजार ५७८ रुग्ण आढळले तर यावर्षी म्हणजेच २०२३ साली राज्यात आत्तापर्यंत एकूण १७ हजार ५४१ जणांना या आजाराचा सामना करावा लागला आहे.

आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू
राज्यात डेंग्यूमुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक ७४ , केरळमध्ये ५१ आणि उत्तर प्रदेशात २८ मृत्यू झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR