23.7 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमनोरंजन‘धक् -धक्’ गर्ल माधुरी झाली ५७ वर्षांची

‘धक् -धक्’ गर्ल माधुरी झाली ५७ वर्षांची

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ९० च्या दशकातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री होती. अभिनयासोबतच माधुरीने आपल्या भन्नाट डान्समुळे करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. म्हणूनच तिला धक्-धक् गर्ल म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या ग्लॅमर आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी माधुरी आज आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

१५ मे १९६८ साली मुंबईत जन्मलेल्या माधुरीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मिळालेल्या माहितीनुसार, माधुरीने १९८४ मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या ‘अबोध’ या चित्रपटाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. तर १९८८ मध्ये रिलीज झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने माधुरी दीक्षितला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटात तिच्यावर चित्रित केलेले ‘एक दो तीन’ हे गाणे ब्लॉकबस्टर हिट ठरले होते. या चित्रपटात माधुरीने मोहिनी नावाच्या स्टेज डान्सरची भूमिका साकारली होती. अनिल कपूरसोबतची तिची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मोहिनीच्या भूमिकेत माधुरीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते.

यानंतर माधुरीने बेटा, दिल, देवदास, हम आपके है कौन, दिल तो पागल है, पुकार, साजन, खलनायक, अंजाम, राम लखन, परिंदा, प्रेम गीत आदी सुपरहिट चित्रपटांत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR