धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: चित्र स्पष्ट; बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख यांच्यात होणार थेट लढत

धाराशिव (मछिंद्र कदम) : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी (दि. ४ जून) शेवटचा दिवस होता. या दिवशी झालेल्या घडामोडींनंतर निवडणुकीतील चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. रिंगणात असलेल्या ९ उमेदवारांपैकी ७ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.

महायुतीकडून भाजपचे माजी मंत्री बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख हे दोन प्रमुख उमेदवार आता रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीची शक्यता मावळली आहे. अर्चना विनोद गंगणे, अहमद राज सय्यद, महालिंगे मिलिंद गणपती, शरद रामभाऊ यादव, सचिन भारतराव पवार, सहाल बिन आमेर चाउस आणि संजय पांडुरंग मुंदडा या सात अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत १७ ने घट झाली आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका रखडल्यामुळे तेथील सदस्य संख्या कमी झाली आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यात ३६७, धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यात ३१७ तर बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यात ३०४ असे एकूण ९८८ मतदार आहेत.

दोन्ही प्रमुख उमेदवार मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील असल्याने स्थानिक पातळीवर या निवडणुकीची चुरस वाढली आहे. ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून, मराठवाड्यातील आगामी राजकीय समीकरणांची चाचणी मानली जात आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येक मतासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, निकालाकडे आता तीनही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news