22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाआयसीसी क्रमवारीत चमकला ‘ध्रुव’

आयसीसी क्रमवारीत चमकला ‘ध्रुव’

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताच्या युवा खेळाडूंची ताकद दिसून आली आहे. रांची कसोटीत विजयाचा हिरो ठरलेला सामनावीर ध्रुव जुरेलने या क्रमवारीत गगणभरारी घेतली आहे.

तर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनाही ताज्या कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने रांचीमध्ये ५५ धावांची इंिनग खेळली होती. पण तरीही त्याला एक स्थान गमवावे लागले आहे. तर ही मालिका खेळत नसल्याने विराट कोहलीला आपले स्थान गमवावी लागली आहेत.

भारताकडून केवळ दोन कसोटी सामने खेळून प्रसिद्धीझोतात आलेल्या ध्रुव जुरेलने ३१ स्थानांची झेप घेतली आहे. रांची कसोटीनंतर तो १०० व्या स्थानावर होता, आत तो ६९ व्या स्थानावर पोहोचला. शुभमन गिल आता चार स्थानांच्या प्रगतीसह 31व्या स्थानावर पोहोचला आहे. यशस्वी १२ व्या स्थानावर आहे तर रोहित शर्मा एका स्थानाच्या नुकसानासह १३ व्या स्थानावर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR