34.5 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeमहाराष्ट्रसुषमा अंधारे राष्ट्रवादी प्रवेशासाठी अजितदादांना भेटल्या?

सुषमा अंधारे राष्ट्रवादी प्रवेशासाठी अजितदादांना भेटल्या?

अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याबाबतचा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थिती केला आहे. सुषमा अंधारे या अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेटल्या होत्या, याबाबतची खात्रीदायक माहिती फेब्रुवारी महिन्यातच आपल्याकडे आली असल्याचे दमानियांनी सांगितले आहे. तसेच हे खरं की खोटे हे अंधारेंनी सांगावे असे आव्हान देखील अंजली दमानिया त्यांनी दिले आहे.

सध्या सुषमा अंधारे आणि अंजली या दमानिया यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम सुषमा अंधारे यांनी एक्सवर अंजली दमानिया यांचे नाव असलेल्या ब्रॉडकास्ट ग्रुपचा स्क्रीन शॉट शेअर केला होता. या ग्रुपच्या मेसेजमध्ये सुषमा अंधारे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

हा स्क्रिनशॉट समाज माध्यमावर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्यावर टीका केली अंधारे म्हणाल्या, अहो दमानिया, जरा दमाने घ्या की, किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस. कधीतरी पूर्ण महत्त्वाचे म्हणजे अधिकृत माहिती घेत चला, असा टोला दमानिया यांना लगावला.

तुम्ही या ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल करत तुम्ही माझ्या ढफ म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. याला अंजली दमानिया यांनी उत्तर दिले आहे. दमानिया म्हणल्या, केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे. खरंतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले.

मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती, की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात, आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे की नाही यावर खरे उत्तर द्याल का? बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही.

तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. तुमच्या माहितीसाठी, काल एका चैनल ने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार, ह्यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्रॉडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुप वर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला. असा खुलासा दमानियांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR