मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये तिच्या हातातील अंगठी पाहून चाहत्यांमध्ये तिने गुपचूप साखरपुडा केला का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र अभिनेत्री किंवा तिच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही छायाचित्रे आणि व्हीडीओंमुळे तिच्या गुप्त साखरपुड्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या दृश्यांमध्ये त्रिशाच्या हातातील अंगठी आणि गळ्यातील खास पेंडंटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यावरून विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
खरंच तिने साखरपुडा केला आहे का, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्रिशानेही या अफवांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून त्रिशाचे नाव अभिनेता आणि राजकीय नेते थलपती विजय यांच्याशी जोडले जात आहे.
दुसरीकडे, विजय थलपती यांचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. त्यांची पत्नी संगीता यांनी विजय यांचे विवाहबा संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४ अंतर्गत क्रूररतेचा आरोप केला आहे. संगीता यांनी दाखल केलेल्या याचिकेत विजय यांचे कोणासोबत विवाहबा संबंध होते याचा उल्लेख केला नसला तरी हे प्रकरण अभिनेत्री त्रिशा कृष्णनशी जोडले जात आहे.
















