39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडादिनेश कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत

दिनेश कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्धच्या आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यातही त्याने आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, या सामन्यात आरसीबीला पराभव पत्करावा लागला. अशातच कार्तिकने या स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.

कार्तिक म्हणाला की, कदाचित एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) मैदानावरील हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो. कार्तिक सुरुवातीपासूनच आयपीएलचा भाग आहे आणि त्याने सहा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. कार्तिक कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही राहिला आहे.

आयपीएलचे १७ वे सत्र सुरू होण्यापूर्वीच कार्तिकचे आयपीएलचे हे शेवटचे सत्र असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सूत्रांच्या मते, आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर कार्तिकला कॉमेंट्रीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे मानले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान कार्तिक कॉमेंट्री करत होता आणि आयपीएलच्या तयारीमुळे त्याने कॉमेंट्री मध्येच सोडली होती. मात्र, कार्तिक आता निवृत्तीबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR