36.3 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच

‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच

मुंबई : बॉॅलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा २००१ साली प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाची कथा, अनिल कपूर यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अशातच २३ वर्षांनंतर आता ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल येत आहे.

सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांच्या मार्फिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘नायक २’
चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे आहे. तर मिलन लुथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. पण अद्याप चित्रपटामधील कलाकारांची कास्टिंग सुरू आहे. मिलनबद्दल सांगायचे तर, त्याने ‘कच्चे धागे’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ सारखे चित्रपट केले आहेत. लेखक रजत अरोरा ‘नायक २’साठी मिलनसोबत काम करणार आहे.

अनिल कपूरने साकारलेली ‘नायक’मधील व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात ताजी आहे. मात्र, २३ वर्षांनंतर या सिक्वेलचे काम सुरू होत आहे. ‘नायक २’ ची कथा कल्पनेवर आधारित नवीन कथा असेल आणि नायक राजकीय व्यवस्थेला आव्हान देण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या सिनेमातील कलाकारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नसून यात पुन्हा अनिल कपूर दिसणार का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दरम्यान, ‘नायक : द रियल हिरो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर यांनी केले होते. तर ए. एम. रत्नम हे या चित्रपटाचे निर्माता होते. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल, जॉनी लिव्हर आणि शिवाजी साटम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. आजही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यानंतर आता ‘नायक २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR