सोलापूर : श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी आसरा चौकात माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते 1लाख लाडू प्रसाद वाटप करण्यात आले. छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
सुरुवातीला छत्रपती ग्रुप च्या वतीने बनवण्यात आलेल्या भव्य रामाच्या प्रतिकृतीचे पूजन माने यांच्या हस्ते करण्यात आले. आसरा चौकामध्ये पताका, झेंडे लावून चौक परिसर सुशोभित करण्यात आला होता. यावेळी जयकुमार माने, सुरेश ताकमोगे , सचिन चौधरी , प्रतीक ताकमोगे, जय ताकमोगे , विलास लोकरे , लक्ष्मण जाधव , संतोष जाधव , शाम पाटील , विश्वास ताकमोगे , विशाल ताकमोगे नेताजी शास्त्री ,पकंज लोंढे आदी जुळे सोलापूर परिसरातील लोक उपस्थित होते.