34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयव्यंकय्या नायडू, मिथुन चक्रवर्तींसह मान्यवरांना पद्म पुरस्कारांचे वितरण

व्यंकय्या नायडू, मिथुन चक्रवर्तींसह मान्यवरांना पद्म पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, सुलभ इंटनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांच्यासह अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यंकया नायडू, बिंदेश्वर पाठक आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना पद्वविभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले. बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. अभिनेता मिथुन चक्रवर्ती, गायिका उषा उत्थुप, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, उद्योगपती सीताराम जिंदल यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये प्रदान केला जातो. यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व कामगिरी करणा-या मान्यवरांना प्रदान केले जातात. यामध्ये कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक कामगिरी, विज्ञान आणि इंजिनिअरिंग, व्यापार आणि उद्योग, चिकित्सा, साहित्य आणि शिक्षा, खेळ या क्षेत्रांचा समावेश आहे.

पद्म पुरस्कारांची घोषणा प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. २०२४ या वर्षासाठी राष्ट्रपतींनी १२३ पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. पुरस्कार विजेत्यांमध्ये ३० महिला तसेच परदेशी, अनिवासी भारतीय अशा आठ जणांचा समावेश होता. याशिवाय ९ जणांना मरणोत्तर पुरस्कार वितरित करण्यात आला आहे. साधारण अर्धे पुरस्कार सोमवारी वितरित करण्यात आले तर उर्वरित पुरस्कार पुढच्या आठवड्यात वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे.

यावेळी द्रोण भूईयाँ यांचे पंतप्रधानांनी पाय धरले त्यांनी आधी पंतप्रधानांना वंदन केले. त्यानंतर पंतप्रधानही त्यांच्यासमोर झुकले. भुईयाँ हे ओजपली लोकनर्तक आहेत. एक हजार जुनी कला जोपासत महाकाव्य आणि पौराणिक कथांचे ते सादरीकरण करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR