बार्शी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय, आळजापूर येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त विकी (दादा) घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन आणि फळे वाटप करण्यात आले. यावेळी आळजापूरच्या सरपंच मोनिका गहिनीनाथ घुगे, उपसरपंच बाबासाहेब भाऊराव वडवे, ग्रामसेवक दादासाहेब कराड, रोजगार सेवक राजभाऊ उंबरे, दयानंद घुगे, बापू घुगे, मयूर दराडे, मुबारक शेख, पप्पू मुजावर, विकी दादा मित्र मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विकी (दादा) घुगे यांनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कष्टकरी, ऊसतोड मजुर, वंचित, बहुजन समाजासह, उपेक्षित, गोरगरीब जनतेसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिल्याने गोपीनाथ मुंडे हे जनतेच्या मनातील लोकनेते होते असे सांगितले.