बारामती: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीतील गोंिवद बाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात.
वेळप्रसंगी त्यांना संकटांनाही तोंड द्यावे लागते. मात्र आयुष्यातील काही दिवस असे असतात की, या सर्व संकटांना विस्मरण करून आनंदाने कुटुंबाच्यासमवेत दिवस घालवावे जगावे, अशी इच्छा असते. अशी इच्छा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दीपावली… महाराष्ट्रासह संबंध देशात लोक आनंदाने दिवाळी साजरी करत आहेत.
महाराष्ट्रातील जनतेला हा दिवाळीचा सण त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी येऊ व पुढील इच्छा आकांक्षांना यश मिळो, अशा शुभकामना दिवाळीनिमित्त शरद पवारांनी व्यक्त केल्या.
कालच शरद पवार यांनी पुण्यातील बाणेर येथे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीयांच्या झालेल्या ‘गेटटुगेदर’ला हजेरी लावली होती. याठिकाणी अजित पवारही उपस्थित होते.