36.9 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रमृत भिका-याच्या गोधडीत सापडले लाखो रुपये

मृत भिका-याच्या गोधडीत सापडले लाखो रुपये

बुलडाणा : चित्रपटातले सगळे प्रसंग काही खरे नसतात, म्हणूनच आपण ते डोळे विस्फारून पहात असतो. मात्र बुलडाण्यात एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच एक घटना घडली. एका दुचाकीच धडक बसून रस्त्यावरील भिकारी जखमी झाला आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याचे सामन तपासले असता, त्यातून जे सामान सापडले, ते पाहून सर्वांचे डोळेच विस्फारले. पोलीसही चकित झाले.

रस्त्यावरच्या त्या भिका-याच्या गोधडीत चक्क लाखो रुपये सापडले. एवढेच नव्हे तर अनेक बँकांची पासबुके, एटीएम आणि चेकबुक्सही होती. हा सगळाचा प्रकार चक्रावून सोडणारा होता.
एखाद्या हिंदी सिनेमात शोभावा अशी ही घटना जिल्ह्यातील मेहकर हेथे घडली. दीपक मोरे असे त्या मृत भिका-याचे नाव आहे. तो मेहकर ते डोनगाव रस्त्यावरून सायकलवर जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराची त्याला धडक बसली आणि त्यामध्ये तो भिकारी गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात भरती करण्यात आले. मात्र अकोल येथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

मृत पावलेला हा भिकारी नेमका कोण आहे, तो कुठला याचा पोलिस शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी त्याचे उर्वरित सामान तपासायला सुरूवात केली आणि ते चक्रावलेच. कारण त्या भिका-याकडे असलेल्या गोधडीत आणि थैलीमध्ये अनेक बँकाची पासबुक्स, एटीएम कार्ड्स, आणि पिशवीत लाखो रुपयांची चिल्लर आढळली. तसेच त्याच्या बँकेच्या पासबूकमध्ये लाखो रुपयांची नोंद असल्याचेही पोलिसांना आढळले.

त्याच्याकडील कागदपत्रांवरून मृत पावलेला हा माणूस म्हणजे मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील दीपक मोरे नावाचा रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी दराही वेळ न दवडता त्याच्या कुटुंबियांचा शोध घेतला आणि त्याची सर्व कागदपत्र, आणि पैसे त्यांच्याकडे सुपूर्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR