तुळजापूर : तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत दागिने वितळवू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. पुजारी मंडळाने औरंगाबाद खंडपीठात शासन निर्णयाविरोधात धाव घेतील होती.
तुळजाभवानी देवीच्या २०७ किलो सोने व २ हजार ५७० किलो चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला उच्च न्यायालयाच्या दोन न्यायायाधीशांच्या खंडपीठने स्थगिती दिली आहे. विधी व न्याय विभागाने तुळजाभवानी मंदीर संस्थानला सोने चांदी वितळवायला परवानगी दिली होती. मात्र त्याला काही भाविक पुजारी यांचा विरोध होता. त्यानंतर ंिहदू जनजागरण समितीने कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. तब्बल १३ वर्षानंतर राबवली जाणार होती. सोने वितळवणे प्रक्रिया मात्र आता त्याला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.
भक्तांनी २००९ पासून २०७ किलो सोने आणि २ हजार ५७० किलो चांदी अर्पण केली आहे. १ जानेवारी २००९ ते १० जून २०२३ या दरम्यान जमा झालेल्या सोने चांदी वितळवण्यास सरकारने अध्यादेश काढून परवानगी दिली होती. कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली असून सुनावणी आता ९ जानेवारी २०२४ ला होणार आहे. मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूची नोंद ही सोने सदृश्य असल्याने कोर्टाने नियमावली व प्रक्रिया सादर करीत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.