27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड पत्नीसह मुलाला संपविले

कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड पत्नीसह मुलाला संपविले

बिझनेसमनच्या घरात मृत्यूचे तांडव

कल्याण : दुहेरी हत्याकांडाने कल्याण शहर हादरले. एका बिझनेसमनने त्याची पत्नी आणि सात वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी बिझनेसमन घरातून फरार झाला आहे. दीपक गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी अश्विनी आणि सात वर्षांच्या मुलाचे आयुष्य संपवले.

या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी दीपक गायकवाड याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान ही हत्या नेमकी का झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक गायकवाड हा पत्नी आणि मुलासह कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीनमधील एका इमारतीत रहात होता. त्यांचे कल्याण शहरातच नानूज वर्ल्ड नावाचे खेळण्यांचे दुकान आहे. काल दुपारी दीपक याने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला होता. त्यांच्याशी बराच वेळ फोनवरून बोलणंही झालं. मात्र त्यानंतर अचानक काय झालं माहीत नाही, पण त्याने त्याची पत्नी आणि लहान मुलाचा गळा दाबून, दोघांची हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने स्वत:चे आयुष्य संपविण्याचाही प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळाने तो घटनास्थळावरून फरार झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR